एक राजेशाही मराठी विवाह सोहळा ! बाय बोधनकर इव्हेंट्स
आषाढ महिन्याचा ९ वा दिवस .. रिमझिम पावसाच्या सारी आणि सनई चे मंजुळ स्वर .. केळीच्या पानाचा डोलारा , झेंडूच्या फुलांचे " इंनोवेटिव्ह " तोरण , आंब्याच्या पानाची आरास , रेखीव रांगोळी आणि पंचपक्वान्नाचा सुवास.. देवब्राह्मण पूजेची तयारी आणि कुलकर्णी कुटुंबातील सर्व पाहुण्याची लगबग .. तेजस आणि गायत्री च्या स्वप्नवत सुरेख विवाहसोहळ्याचा खऱ्या अर्थाने पहिला दिवस ... ट्रेंनिंग मध्ये असताना मारवाडी, पंजाबी , गुजराती समाजामध्ये ५-७ दिवसांचे विवाह पहिले आणि कामही केलं .. कायम मनात प्रश्न असायचा आपले मराठी समाजाचे विवाह सोहळे एवढे भव्यदिव्य आणि ५-७ दिवसांचे का नाही होत ? मग अनुभवरून लक्षात आल .. कुलकर्णी आणि नाईक यांसारखे यजमान असणे आवश्यक आहे .. ४ माही पूर्वी या विवाह सोहळ्याच प्लांनिंग सुरु झालं .. अतिशय सुस्वभावी , आणि जमिनीवर पाय असणारे हे कुटुंब .. नवरदेव सुद्धा एक आदर्श मुलगा , भाऊ आणि आता नवरा .. म्हंजे तेजस मला फोन केल्यानंतर "दादा दोन मिनिटं बोलू ?" अशी सुरुवात करणारा.. तर अश्या या सुसंकृत परिवाराची एकच अपेक्षा लग्न सर्वांनी एन्जॉय केला पाहिजे , धमाल केली पाहिजे आणि...