एक राजेशाही मराठी विवाह सोहळा ! बाय बोधनकर इव्हेंट्स

आषाढ महिन्याचा ९ वा  दिवस .. रिमझिम पावसाच्या सारी आणि सनई चे मंजुळ स्वर .. केळीच्या पानाचा डोलारा , झेंडूच्या फुलांचे " इंनोवेटिव्ह " तोरण , आंब्याच्या पानाची आरास , रेखीव रांगोळी आणि पंचपक्वान्नाचा सुवास.. देवब्राह्मण पूजेची तयारी आणि कुलकर्णी कुटुंबातील सर्व पाहुण्याची लगबग .. तेजस आणि गायत्री च्या स्वप्नवत सुरेख विवाहसोहळ्याचा खऱ्या अर्थाने पहिला दिवस ... ट्रेंनिंग मध्ये असताना मारवाडी, पंजाबी , गुजराती समाजामध्ये ५-७ दिवसांचे विवाह पहिले आणि कामही केलं .. कायम मनात  प्रश्न असायचा आपले मराठी समाजाचे विवाह सोहळे एवढे भव्यदिव्य आणि ५-७ दिवसांचे का नाही होत ? मग अनुभवरून लक्षात आल .. कुलकर्णी आणि नाईक यांसारखे यजमान असणे आवश्यक आहे .. ४ माही पूर्वी या विवाह सोहळ्याच प्लांनिंग सुरु झालं .. अतिशय सुस्वभावी , आणि जमिनीवर पाय असणारे हे कुटुंब .. नवरदेव सुद्धा एक आदर्श मुलगा , भाऊ आणि आता नवरा .. म्हंजे तेजस मला फोन केल्यानंतर "दादा दोन मिनिटं  बोलू ?" अशी सुरुवात करणारा.. तर अश्या या सुसंकृत परिवाराची एकच अपेक्षा लग्न सर्वांनी एन्जॉय केला पाहिजे , धमाल केली पाहिजे आणि कायम करमणुकीची गुंतवून राहिल पाहिजे .. आणि मुकुंद कुलकर्णी सरांचे अगदी जवळचे श्रीमती शाह मॅडम यांनी त्यांच्या मालकीतील वेरूळ येथील कैलास रिसॉर्ट मध्ये हे लग्न करण्यास परवानगी दिली. आणि मुकुंद सर व प्रियांका मॅडम च्या इचछे  नुसार लग्नाच्या नियोजनाची सुरुवात झाली .. श्री घृष्णेश्वर आणि वेरूळ च्या लेण्यांची थिम ठरली आणि आमचे कल्पक डिसाईनार अद्वैत च्या कुंचल्यातून अफलातून अशी थिम निघाली आणि मुकुंद सरांच्या सूचनेनुसार सर्व पत्रिका, आमंत्रणं , बॅनर , स्टचीकर सर्व गोष्टी मूर्त रूपात यायला सुरुवात झाली .. याच वेळेस मेनू , डेकॉर , एन्ट्री , बँड , घोडी, फोटो विडिओ इत्यादी गोष्टींची  सुरुवात झाली आणि सरांचे सहकारी श्री भुवनकर यांचे सोबत जवळपास सर्वच गोष्टी पूर्णत्वाच्या कागदावर आल्या .. आता आमच्या समोर टास्क होता .. तो म्हणजे . स्वप्न तर दाखवल पण आता ते पूर्ण करायच ... मग मंडप मध्ये " नाना टेन्ट चे श्री शंकर जे सरांचे जुने मित्र  , कॅटरिंग मध्ये श्री योगेश जोशी पुण्याहून , फ्लोरिस्ट मध्ये पैठण गेट येथील मुन्ना भाई , musical करमणुकीमध्ये सुप्रसिद्ध सौ आरती पाटणकर , बँड आपला  विजु भाऊ कोळगे चा आणि हा सर्व सर्वांग सुंदर सोहळा कॅमेरात टिपण्यासाठी सज्ज होता तो म्हणजे .. विक्रांत व त्याचे सहकारी  .. नवऱ्यामुलीला सजवण्यासाठी निलोफर मॅडम , सर्व धार्मिक विधी कारण्यासाठी ज्येष्ठ शैलू गुरु आणि उरल्या सुरल्या सर्व जसे trusss , शाही भोज , गिफ्ट बॅग , प्रिंटिंग , टॅटू , मेहंदी, बांगडी , पोर्टर , रूम हॅम्पर्स इत्यादींचे सोय .. "जिथे कमी तिथे आम्ही"  या सवयीप्रमाणे बोधनकर इव्हेंट्स नि पूर्ण केल्या .. संगीत आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या वेगळ्या आणि खुमासदार शैलीने मूळचे  शेवगाव येथील ह मु पुणे येथी श्री प्रसाद  भारदे यांनी यांनी करून संपूर्ण विवाह सोहळयाला एक वेगळा  साज चढवला.. आपण भारता सारख्या संस्कृतीप्रिय देशात राहतो याची जाणीव दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठांना होती आणि त्यामुळे .. रोज एक वेगळी थिम असा करायचा ठरलं .. पाणी पाऊस चे तमा  ना बाळगता हा उत्सव साजरा करायचा आणि हो ते पण कोविड चे प्रोटोकॉल पळून .. ९९.% आमंत्रित हे " लसवंत " होते .. 

 

..... आणि  तेजस , गायत्रीचा हा प्रवास आषाढ महिन्याचा ११ व्य दिवशी आणि आषाढी एकादशी च्या दिवशी म्हणजेच फिरंगी तारीख २२ जुलै रोजी सुरु झाला .. एक एक पाहुणे येत होते .. आमची टीम त्यांचे हसतमुखाने स्वागत करत होती .. सर्व प्रथम गायत्री आणि तिचे कुटुंबीय हैद्रबाद येथून पहाटे ५.३० वा रेल्वे ने औरंगबाद येथी आले .. महेश आणि अक्षय ने त्यांचे स्वागत करून त्यांना वेरूळ येथी मुक्कामी रवाना केले .. आमचा खांदा शिलेदार अक्षित  आणि त्याचे सहकारी कौस्तुभ , साहिल , ऋत्विक , प्रेम , आणि आमच्या महिला सहकारी , वीणा,  वैष्णवी आणि श्वेता वर इतर सहकारी त्यांच्या आगमनाची  वाट पाहत होते .. धुक्याची चादर , पहाटेची वेळ , उकळणारा चहा , कैलास रिसॉर्ट ची हिरवळ आणि पक्षांचा किलबिलाट .. गुलाबाच्या फुलांनी वधू  पक्षाचा स्वागत आणि बॅग उचललेला आंमचा क्रू .. 

चहा नाश्ता झाला , पाहुण्यांचे आगमन झाले आणि आता सर्व वाट पाहत होते ते राजबिंडा अश्या तेजस आणि त्याच्या परिवाराची .. गुळाची ढेप, मोतीच्या माळा  , अत्तराच्या बाटल्या , पायघड्या , पंजाबी  ढोल वाले , कलर गन्स , मिठाई , वेलकम ड्रिंक सर्व काही तय्यार .. आणि वर पक्षाचा आगमन झाला ढोल च्या गजरात राजेशाही स्वागत ..  .. सर्व जण आपली कक्षात दाखल  झाले . आणि .. कुलकर्णी परिवारातील नीरज लऊळ आणि मित्राचा एक शाही बँड व योगेश जोशींच चविष्ट  जेवण .. नाना टेन्ट च्या आलिशान मंडपात सर्व पाहुण्यांची वाट पाहत होते .. एक एक जण आले .. आणि .. जेवण झाल्यानंतर लागेचच आरती पाटणकरांचा " महाराष्ट्राची लोकधारा " हा कार्यक्रम सुरु झाला .. सांगीतिक महाराष्ट्र असाही दिसू शकतो याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम .. आणि ती वेळ आली ज्याची तयारी , झूम मीटिंग च्या मीटिंग घेऊन झाली होती आणि रोहितच्या प्रयत्नांना फळ मिळणार होते .. ती म्हणजे ... " संगीत "  .. उत्तर भारतीय आणि मारवाडी समाजात रुजलेला हा प्रकार मराठी माणसाने कधी आत्मसात केला हे कळलच नाही .. पण लै भारी प्रकार .. परिवारातील सर्वांच्या सुप्त गुणांची ओळख म्हणजे हा संगीत , अबाल वृद्धांना नाचायला आणि थिरकायला लावणारा हा प्रकार म्हणजे संगीत , नवरा नवरी ची एकदम फिल्मीस्टाईल एंट्री म्हणजे संगीत .. आणि आमची तर थिमच होती " बॉलीवूड बॅश " .. धमाल , म्हणजे नुसती धमाल .. कुलकर्णी आणि नायकाचं नव्हे तर आमचे कार्यकर्ते सुद्धा मंडपाच्या बाहेर .. आतील गाण्यावर थिरकत होते .. असा हा पहिला दिवस ... उपासाच्या विविध पदार्थांनी आणि भरपूर नाच गाण्यांनी संपन्न झाला ..  

 

दुसरा दिवस होता तो म्हणजे .. व्याही भोजन आणि सीमंती पूजनाचा .. दोन्ही परिवारीतील सर्व जण व्यवसायात असल्याने .. वेळेचं काटेकोर पाने पालन होत होत .. आम्ही नेहमी सांगतो लग्नाच्या १००% यशस्वीतेसाठी काय आवश्यक आहे तर वेळा पाळणं .. पाऊसाची रिमझिम .. आणि आमच्या अम्ब्रेला बॉईज च छत्री घेऊन सर्वाना मंडप पर्यंत पोहोचवणं हे अति महत्वाचा काम .. चालू होत .. "पधारो म्हारे देस"  अशी संकल्पना घेऊन एक छोटे खानी  स्वागत समारंभ .. आणि व्याही भोजनाचा आनंद घेण्यासाठी  डाळ बट्टी चा बेत .. आणि वर ५ गोड पदार्थ .. मग जेवण झाल्यानंतर थोड्या वामकुक्षीच्या वेळ मुद्दाम ठेवण्यात आला होता .. सायंकाळी यथावकाश सीमंती पूजन आणि रुखवत पंगत .. त्याच वेळेस मुकुंदसरांच्या कल्पकतेतून " लख लख  चंदेरी तेजाची न्यारी दुनिया " हि संकल्पना  दोन्ही परिवारातील सर्व स्त्रियांनी हातात दिवे घेऊन मंडपात  आणि घरातील जे स्वर्गवासी झाले आहेत त्यांच्या फोटो समोर ठेऊन कृतज्ञता व्यक्ती केली.. सुंदर लक्ष दिव्यांची  श्रद्धांजली हि आयडियाचं भन्नाट होती नंतर टिपिकल पुणेरी पद्धतीच्या मेनू व उकडीच्या मोदकांसोबत जेवणावळी पार पडल्या .. आणि अतिशय उल्हास पूर्ण वातावरणात २ रा दिवस साजरा झाला .. 

 

आणि आता तो महत्वाचा दिवस .. आषाढ शुद्ध १३ दिनांक २२ जुलै २०२१ .. विवाहाची घटिका .. जवळ आली .. पहाटे पहाटे .. आरती पाटणकरांच्या सहकाऱ्यांनी ... बासरी आणि तबल्याच्या सुरांनी सकाळ मंजुळ स्वरांनी सुमधुर केली .. लौकिक मुहूर्ताच्या  आधी .. धार्मिक विवाह विधी साठी .. वर वधू तयार .. काय दिसत होते दोघेपण .. एकदम पेशवा ... आणि पेशवीण .. ती पेशवाई पगडी आणि ती नऊवारी साडी .. ती नाथ आणि ती बाळी .. तो शेला आणि ते उपरणं .. मधुपर्कानी शैलू गुरूंच्या कड्यावजात मंत्रोच्चरनी झाली विवाहाची आणि सात जन्माच्या गाठीची सुरुवात .. मधुपर्क, विवाहहोम , लाजाहोम , आणि आता सप्तपदी .. आमच्या सहकारी सीमा नि जसा सांगितलं त्याप्रकारे .. सप्तपदी आणि सात वाचनाची आठवण ठेवत फुलाची उधळण करून त्या सोहळ्याला एक वेगळीच झळाळी  आणून दिली .. सप्तपदी आणि कन्यादान संपन्न झाला आणि सर्वांच्या आवाडीच .. असा वरात प्रसंग जवळ आला .. मुहूर्त ११. ५८ चा होता आणि तो गाठायचा असा ठरला ... वेळप्रसंगी नातेवाईकांची नाराजी ओढवून घेतो आम्ही पण आमचा कटाक्ष असतो मुहूर्ताला लग्न लावणं.. डोली मध्ये बसलेली गायत्री आणि नक्षीदार छत्री तेजस च्या  डोक्यावर .. ४ सुवासिनीचा सुंदर मराठी गाण्यावरचा नाच .. भालदार , चोपदार आणि तुतारीच्या गजरात दोघेही  लग्नमंडपात दाखल झाले ..  ... तदेव लग्न .. झाला आणि शिंपल्यातील  अक्षता .. वधू वराच्या डोक्यावर पडल्या .. आणि एकदम ..... सर्व मांडवाच्या नजरा  पुन्हा प्रवेशद्ववारावर  .. आणि बघतात तर काय .. नाईकांच्या विहीणबाई .. तुतारी , सुवसिंनी , भालदार , चोपदार यांच्या सोबत फुलांच्या वर्षावात ऐटीत दाखल होत होत्या ... "आमच्या क्रीटीव्हिटीचा एक छोटासा नजराणा" .. त्याचा काय आहे  .. अस म्हणतात कि मुलाच लग्न आई पाहत नाही .. का पाहत नाही माहिती माही .. पण जेंव्हा असा कळालं तेंच मग सासूबाईंचा स्वागत तर झोकात झालाच पाहिजे .. नंतर लगेचच .. जेवणावळी  झाल्या आणि राजेशाही शाही  पंगती आणि चांदीच्या ताटात विहीन पंगत झाली .. सूनमुख आणि झालीच्या  निम्मिताने पुन्हा दोन्ही परिवाराकडे मंडळी पुन्हा एकदा मंचावर एकत्र जमली आणि कारल्याच्या वेलात ओटी भरून या शाही विवाह सोहळ्याची .. आजच्या दिवसाची सांगता झाली ... सायंकाळी एक छोटे खानी  .. सतार वंदन आणि एक छोटासा स्वागत सभारंभ ... 

 

आता वेळ झाली ती नव्या नवरीचा स्वागत आपल्या घरी करून लक्ष्मी पूजनाची ..  ... रांगोळ्यांची आरास , फुलांचा सडा  , शंखनाद , कमळाच्या फुलांचे साचे .. आणि पंचधान्य असलेली काळाशी .. आईगिरी नंदिनी चे स्तोत्र कानी पडले .. आणि नाईकांची कन्या कुलकर्णी च्या घरात सून म्हणून आली .. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आणि परिवारातील सर्वांच्या सहभागाने आणि आमच्या इव्हेंट च्या टीमचे  दिवस रात्र अथक परिश्रमाचे हे फलित कि हा विवाह सोहळा सत्यनारायणाच्या पूजेने संपन्न झाला .. एक वेडिंग प्लानार म्हणून जवळपास सर्वच लग्नांमध्ये आमची involvment  असते ..कारण wedding  नीड्स टू  बी managed  emotinally .. पण या लग्नाची बातच काही और होती .. निर्विग्न पाने पार पडलेल्या या लग्नाचे वेडिंग प्लानर  म्हणून काम करताना एक वेगळाच आनंद मिळाला .. तर असा हा १८ जुलै पासून २५ जुलै पर्यंत ७ दिवसाचा मराठी शाही विवाह सोहळा निर्विघ्न सापांना झाला .. 

#EventWritesByRVB©️

 

राहुल बोधनकर 

वेडिंग प्लॅनर 

९४२२२०९८९०





Comments

  1. It is worth appreciation the perfect flawless event management maintaining the strict COVID Appropriate Standards.
    Proud of you and your dedicated team efforts for the grand success of this marriage ceremony
    Our best wishes for your successful future
    With regards from Dr Uday Bodhankar
    Executive Director of comhad uk and deputy Chairman of chpa uk

    ReplyDelete
  2. अप्रतिम नियोजन आणि विशेष म्हणजे माझ्यासकट सर्व कलाकारांची आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखी काळजी घेणारे म्हणजे बोधनकर इव्हेंट्स

    ReplyDelete
  3. Keep it up Rahul Congratulations stay blessed

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Helpline for event managers

Virtual Events #NewNornal

मराठी युवकांसाठी वेबीनार - श्री सुहास दाशरथे