एप्रिल फूल
आमचे बाबा तसे खुप रागीट पण मिशकील होते .. आज जवळपास बाबांना जाऊन ७ वर्ष होत आली .. आज १ #एप्रिल .. आम्ही कोटला कॉलनी मधे राहत असतांना जवळ पास दरवर्षी बाबा धमाल करायचे .. खास करून तरूण पोरांना टार्गेट करून धमाल उडवायचे .. त्यांचे वेळेच नियोजन भन्नाट असायच .. बरोबर १ एप्रिल ला .. कोणाचचया तरी घरात एप्रिल फूल पत्र रूपी बाँम्ब पोस्टा मार्फत पोहचवायच आणि संध्याकाळ पर्यंत त्यांच्या घरात धमाल यायची आणि संध्याकाळी कळायचं की हे #बोधनकर काकांनी मजा केली आहे .. 😎😎😎 अशीच एक आठवण .. आमच्या शेजारी अनिल दादा राहत असे .. २४-२६ वर्षाचा असावा .. १९९२-१९९४ सालची गोष्ट असावी .. अनिल दादाचया नावाने त्याच्या तथाकथित प्रेयसीने ( म्हणजे बाबांनी ) पत्र लिहील आणि घरी पोस्टाने पाठवलं .. ( त्यावेळेस पोस्ट efficient होत) .. मी तुझ्यावर प्रेम करते आणि मी तुझ्या बाळाची आई होणार आहे 😂😂😂 एकदम फिल्मी .. काकूंना जाम घाम फुटला .. हे फक्त मला , बाबांना आणि अनिलदादाचया लहान भावाला अजय ला माहीत होत .. आम्ही पोट धरून धरून हसत होतो .. काकु जाम घामेघुम आणि अनिल दादा एकदम सात्विक आणि नाकासमोर ...