Posts

Showing posts from May, 2023

ड्रायव्हर

Image
ड्राइवर  - अफलातून व्यक्तीमत्व .. तो ओळखीचा असो व अनोळखी .. आपण चटकन भरवसा ठेवतो आणि निवांत झोपतो. मग तो कार चा असो कि बस चा .. मला स्वतःला गाडी चालायची आवड असल्याने ड्राइवर या विषयी लहानपणापासून आकर्षण आहे. घरी कोणी मोठी गाडी घेऊन आला कि " काका गाडी चालावू " हा प्रश्न कायम ! जर कोणी ड्राइवर आणला असेल तर मग ड्राइवर काका चला चक्कर मारू .. असा कायम हट्ट .. अतिशय , जबाबदारीच  जोखमीच आणि कष्टाच काम .. बऱ्याच वेळेस ड्राइवर हा सेगमेंट दुर्लक्षित राहतो आणि त्याला दुय्यम वागणूक मिळते .. आता बरेच लोक त्याला राहच्या , प्यायच्या सवाई मुले म्हणतात पण तास काही अनुभव मला तरी नाही .. परवा मलेशिया आणि बाली येथे गेलो तेंव्हा तेथील ड्राइवर शी काही संवाद झाला .. एक ली टॉंग नावाचे ६५ वर्षांचे काका .. अतिशय उत्साही आणि गाडी वर जबरदस्त कंट्रोल .. रस्त्यांची इत्यंभूत माहिती .. आता त्यात नवल काय पण ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला वागणूक दिली ती खरंच लक्षात ठेवण्यासारखी ... ६५ वर्षांचा माणूस एवढ्या अदबीनं बोलतो थोडं ओकवॊर्ड झाला.. दुसरा चँग ली भेटला .. पाणी पाहिजे का असा विचारणारा पहिलाच ड्राइवर भेटला .