ड्रायव्हर

ड्राइवर  - अफलातून व्यक्तीमत्व .. तो ओळखीचा असो व अनोळखी .. आपण चटकन भरवसा ठेवतो आणि निवांत झोपतो. मग तो कार चा असो कि बस चा .. मला स्वतःला गाडी चालायची आवड असल्याने ड्राइवर या विषयी लहानपणापासून आकर्षण आहे. घरी कोणी मोठी गाडी घेऊन आला कि " काका गाडी चालावू " हा प्रश्न कायम ! जर कोणी ड्राइवर आणला असेल तर मग ड्राइवर काका चला चक्कर मारू .. असा कायम हट्ट .. अतिशय , जबाबदारीच  जोखमीच आणि कष्टाच काम .. बऱ्याच वेळेस ड्राइवर हा सेगमेंट दुर्लक्षित राहतो आणि त्याला दुय्यम वागणूक मिळते .. आता बरेच लोक त्याला राहच्या , प्यायच्या सवाई मुले म्हणतात पण तास काही अनुभव मला तरी नाही .. परवा मलेशिया आणि बाली येथे गेलो तेंव्हा तेथील ड्राइवर शी काही संवाद झाला .. एक ली टॉंग नावाचे ६५ वर्षांचे काका .. अतिशय उत्साही आणि गाडी वर जबरदस्त कंट्रोल .. रस्त्यांची इत्यंभूत माहिती .. आता त्यात नवल काय पण ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला वागणूक दिली ती खरंच लक्षात ठेवण्यासारखी ... ६५ वर्षांचा माणूस एवढ्या अदबीनं बोलतो थोडं ओकवॊर्ड झाला.. दुसरा चँग ली भेटला .. पाणी पाहिजे का असा विचारणारा पहिलाच ड्राइवर भेटला .. मग गप्पा मारत तो चीन हुन इथे कसा आला आणि कसा सेटल झाला .. एक गम्मत होती .. दोन ड्राइवर भारतीय मूळचे  भेटले .. एक होता गणेश आणि दुसरी होती नलिनी .. दोघेही मुळचे  केरळ पण त्यांची हे ४ ठी पिढी .. हिंदी चा संबंध काहीही नाही. दोघांनी हि कॉवीड  मध्ये जॉब गमावले पण टॅक्सी चालव्हायला बिलकुल लाज नाही.. विशेष म्हणजे जेंव्हा नलिनी ची टॅक्सी बुक झाली तर तिनी टेक्स्ट केल " माझी गाडी छोटी आहे .. बॅग्स किती आहेत ? " मग एअरपोर्ट वर जाऊ पर्यंत .. भारतीय लोक्स ४ थी  पिढी जरी असली तरी मुळचे  भारतीयच राहतात या वर शिक्का मोर्तब .. 

बाली येथे तर अवाण नावाचा एक अवलिया ४ दिवस आमच्या बरोबर होता .. ७ गाड्यांचा मालक कोरोना काळात एक एक विकत गेला घर चालवण्यासाठी आणि एका गाडी वर आला .. काय जबरदस्त माणूस होता .. २४-२५ वर्षांचा असेल .. एक गोंडस मुलगी होती जी आजी आजोबांजवळ होती . तो आणि त्याची बायको बाली मध्ये राहत होते .. अतिशय मन मिळवू आणि गप्पिष्ट असा  अवाण कायम लक्षात राहतो .. बाली तील  विवाह समारंभ कसे होतात .. त्याचा कसा झाला .. पांडव पासून रामायण पर्यंत बाली कसा इन्व्हॉल्व्ह आहे हे सांगण्यापासून .. मधेच जोक्स मारत दिवस सार्थकी लावायचा .. या ड्राइवर मूळे  आपली ट्रिप भारी झाली.. कुठे काय खायचा या पासून कुठे काय बघायचा इथं पर्यंत सगळं माहित असणारे आपले मार्गदर्शक ड्राइवर कोम्मुनिटी ला लाखो सलाम .. 

आपल्या बरोबर च्या ड्राइवर ला योग्य वागणूक द्या .. राहायची उत्तम सोय करा .. कारण तो जागा तर आपण ठीक आणि तो झोपला तर संपूर्ण गाडीच झोपेल 😂🥰🥰🥰

राहुल विनय बोधनकर
छत्रपती संभाजीनगर 












Comments

Popular posts from this blog

Virtual Events #NewNornal

Helpline for event managers

मराठी युवकांसाठी वेबीनार - श्री सुहास दाशरथे