Virtual Events #NewNornal

ना धूळ ना ऊन , ना पळापळ ना दगदग , ना जेवण , ना खाणे , ना पिणे , ना आरडा ओरडा , ना घशाला कोरड , हे आहे #NEWNORMAL #VIRTUALCONFERENCE , महाराष्ट्र ऑप्थअलमॉलॉजिकल सोसायटी नि ह्या इव्हेंट ची जबाबदारी आम्हाला दिली आणि नुकत्याच चालू केलेल्या  बोधनकर  कन्सल्टन्सी सर्विसेस या नवीन IT  स्टार्टअप च्या माध्यमातून पहिली वाहिली वर्चुअल कॉन्फरेन्स घेण्यात आली .. २०२० आणि कोरोना हे आपले शिक्षकच ,आहेत  नव नवीन संकलपना आणि विचार करायला भरपूर वेळ मिळाला , माझ्या टीम चा मॅनॅजमेन्ट कौशल्य आणि IT  टीम च तांत्रिक कौशल्य या दोघांचाही छान सुरेख संगम झाला आणि #MOSVIRCON२०२० अस्तित्वात आली. साधारणतः ऑगस्ट २०२० मध्ये आम्हाला नेहमीच सपोर्ट करणाऱ्या DR सुनयना मलिक मॅडम नि कॉल केला आणि सांगितलं ये इव्हेंट तुमकोही कारना है .. वेबिनार घेणं आणि कॉन्फरेन्स घेणं ते पण ३D  इफेक्ट सह  थोडा दडपण आल.
 पण जेंव्हा आपले ग्राहक हक्काने सांगतात तेंव्हा जबाबदारी वाढते .. आणि मग काम सुरु झाल , ३D , वेब साईट , रेजिस्ट्रेशन , स्पीकर सोबत कोऑर्डिनेशन फक्त जेवण आणि मंडप सोडला तर बाकी सगळं सुरु झाल .. आणि इव्हेंट चा दिवस उजाडला , रात्री काम करण आणि  सकाळी लवकर जॉईन होणं हे काही नवीन नाही पण  ते  व्हर्चुअल ?  , सगळंच नव. काल तर मी हॉल A  मध्ये जॉईन झालो आणि इव्हेंट सुरु झाला , काही काळायचया आता  कसा झाला ? पण  उदघाटन समारंभ झकास .. झाल्यानंतर सर्वानी आमचे अभिनंदन केले. एक नवीन क्षेत्र , नवीन अशा , नवीन व्यवसाय आणि तो पण जुन्या व्यवसायाशी निगडित. या पूर्ण इव्हेंट मध्ये माझी टीम खंबीर पाने सोबत होती, त्यांना हि हे प्रकरण नवीन होत.. पण आता सवय झाली .. थँक्स - वीणा , महेश , गायत्री , संपदा , मुग्धा , अक्षय , अजय , अद्वैत , अक्षित , ऋषिकेश , आणि सर्वात महत्वाचे अभिजीत , अखिलेश .. आपल्या प्रत्येक नववनवीन संकल्पनेत खंबीर साथ देणारी शर्वरी , आई आणि गार्गी यांचाही मोठा सहभाग होता ... आमची सेनाही तेवढीच शक्तिशाली आहे आणि त्यामुळे नव नवीन संकल्प घेत प्रगती साधणयाचा प्रयत्न सुरु आहे .. पण तरी एक इव्हेंट मॅनेजर म्हणून .. ऊन , धूळ असलेले इव्हेंट मध्ये जास्त मजा येते .. पण या नवीन संकल्पनेची थँक्स तो कोरोना .. 

©️ राहुल बोधनकर - इवेन्ट राईट्स ( @eventwrites by ©️ Rahul Bodhankar  )
+९१९४२२२०९८९० 




















Comments

Popular posts from this blog

Helpline for event managers

मराठी युवकांसाठी वेबीनार - श्री सुहास दाशरथे