Posts

Showing posts from May, 2024

मित्र हरवला आहे 😢

मित्र हारावला आहे  परवा विजु ला फोन लावला , फ़ोन नाही  उचलला , आणि फोन पण नाही केला  मग कवी ला फोन लावला .. मी बीझी आहे करतो , पण नंतर पण नाही केला फोन मग म्हणालो चला जाऊन भेटुन पिंटु ला .. गेलो तर छोटा पिंटु म्हणाला बाबा गावाला गेलाय  नाऱ्या , मन्या , भज्या  सगळ्यांशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न केला ..  बिझी ..  बिझी ..  बिझी .. मी पण आणि तू पण ...म्हणून मित्र हरवलाय    काय झालंय काय ? कसली स्पर्धा आहे ? कुणाला दाखवायचं  आहे ? कुणासाठी करायचं आहे ? याचे काही उत्तर ? फेसबुक आणि इन्स्टा , व्हाट्स अँप वर अंगठा दाखवला कि झाला झालं .. म्हणून मित्र हरवलं आहे ..   .. इतके बिझी ? कि एकेकाकळी मित्राच्या घरी हक्काने वावरणारे आपण इतके बिझी ? म्हणून मित्र हरवला आहे ..  व्यवसाया निमित्त आपलं नवीन सर्कल तयार होतं म्हणून जुन्यांना विसरायचं ? म्हणून मित्र हरवला आहे  एकमेकांना ज्या नावाने हाक मारायचो त्यात आता सर , बडी असे अनेक नवीन असांस्कृतिक शब्दांनी भर घातलीय - म्हुणुन मित्र हरवला आहे   मैत्रीचा एक नवीन काळ सध्या सर्वच अनुभवत आहेत .. आधी लहान सहान गोष्टी एकमेकांना सांगणारे मित्र एकमेकांपासून सर्व क

काश्मीर - खुललेलं नंदनवन

Image
काश्मीर ..   नंदनवन , स्वर्ग , पॅरॅडाईस , किती विशेषणं  लावावे ? किती नाही ! .. लहानपणापासून प्रबळ इचछा  होती काश्मीर बघण्याची , पण कधी आर्थिक, तर कधी राजकीय 😢😢😢 आणि कधी मनातील भीती पोटी या सुंदर प्रदेशास भेट द्यायचा योग नाही आला..एक शापीत भुमी असच काहीसं चित्र मनात होतं .. ३७० कलम चया आधी आणि नंतर ऐकलं खुप होतं ..  खर म्हणजे जायचा का नाही  हा प्रश्न होता , आई ची तब्येत त्याला कारण होतं , पण वैशू , वैभव आणि डॉ आनंद यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल . आणि ६ मे ते १२ मे असा प्लॅन ठरला .. आता पर्यंत आम्ही स्वतः बुकिंग करायचो आणि एक्सप्लोर करायचो , पण या वेळेस म्हणालं  बघू तर ग्रुप ची काय मजा आहे .. आमचे मित्र आशुतोष बडवे यांच्या मार्फत वीणा वर्ल्ड मार्फत जायचा ठरलं .. मतदानाची तारीख नक्की ठरली नव्हती , पण बुकिंग तर करायच होत .. बघू काय होतं  .. बुकिंग केली आणि मनातला प्रवास सुरु झाला .. निर्वाचन आयोगाच्या पत्रकार परिषद चालू होती आणि संभाजीनगर ची निवडणूक ७ मे अशी abp  माझा नि दाखवली आणि म्हणलं झाला आता टूर शिफ्ट करावा लागणार , कारण मतदान श्रेष्ठ. पण नंतर कळलं १३ मे आहे आणि आमचा टूर  ६ ते