काश्मीर - खुललेलं नंदनवन

काश्मीर ..  

नंदनवन , स्वर्ग , पॅरॅडाईस , किती विशेषणं  लावावे ? किती नाही ! .. लहानपणापासून प्रबळ इचछा  होती काश्मीर बघण्याची , पण कधी आर्थिक, तर कधी राजकीय 😢😢😢 आणि कधी मनातील भीती पोटी या सुंदर प्रदेशास भेट द्यायचा योग नाही आला..एक शापीत भुमी असच काहीसं चित्र मनात होतं .. ३७० कलम चया आधी आणि नंतर ऐकलं खुप होतं ..  खर म्हणजे जायचा का नाही  हा प्रश्न होता , आई ची तब्येत त्याला कारण होतं , पण वैशू , वैभव आणि डॉ आनंद यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल . आणि ६ मे ते १२ मे असा प्लॅन ठरला .. आता पर्यंत आम्ही स्वतः बुकिंग करायचो आणि एक्सप्लोर करायचो , पण या वेळेस म्हणालं  बघू तर ग्रुप ची काय मजा आहे .. आमचे मित्र आशुतोष बडवे यांच्या मार्फत वीणा वर्ल्ड मार्फत जायचा ठरलं .. मतदानाची तारीख नक्की ठरली नव्हती , पण बुकिंग तर करायच होत .. बघू काय होतं  .. बुकिंग केली आणि मनातला प्रवास सुरु झाला .. निर्वाचन आयोगाच्या पत्रकार परिषद चालू होती आणि संभाजीनगर ची निवडणूक ७ मे अशी abp  माझा नि दाखवली आणि म्हणलं झाला आता टूर शिफ्ट करावा लागणार , कारण मतदान श्रेष्ठ. पण नंतर कळलं १३ मे आहे आणि आमचा टूर  ६ ते १२ मे होता .. हुश्श्श ... 

काश्मीर च वर्णन शब्दात आमच्यासारख्या पामराला तर शक्य नाही .. पण तरी हा छोटासा प्रयत्न  .. माझा मूळ उद्देश काश्मीर हा डेस्टिनेशन वेडिंग म्हणून बघायचा दृष्टिकोन होता.. केसर , बर्फ आणि हिरवळ याची मुक्त उधळण असणारा हा प्रदेश याला दैवी देणं आहे असंच समजा .. प्रचंड सी आर पी एफ चा चोख बंदोबस्त  , चप्पे चप्पे पार जवान तैनात त्यामुळे निर्धास्त पणे फिरता  येत होत.. प्रणव आमचा टूर  मॅनेजर आणि त्याच्या बरोबर असणारा करण   .. दोघेही आमच्या ग्रुप चे  पहिल्या दिवसापुसून सदस्य झालेले .. 

पहिला दिवस , जेवण आणि नागिन लेक च्या विस्तीर्ण आणि शांत परिसरारात पहिल्या मजल्यावरील हाऊसबोट च्या डेक वर आमची रूम म्हणजे दुधात  केसर युक्त साखर .. मग काश्मिरी वेशात पहिल्याच दिवशी फोटो शूट .. आपला काय आपण कुठेही सूट होतो .. जैसे देश  वाईस भेस .... उन्हाळ्यामध्ये पहाटे ५ वाजता उजेड ( सूर्योदय ) आणि रात्री ८ वाजता अंधार ( सूर्यास्त ) असल्यामुळे लेक अजूनच छान दिसतात होता .. आपल्याकडे घरी कश्या गाड्या येतेय भाजी आणि इतर सामान विकायला तशी छोट्या छोट्या बोटी येत होत्या .. मग थोडी फार खरेदी करून आम्ही फेर फटका मारला तो नागिन  लेक च्या राजा जी च्या स्पीड बोटीतून .. जुन्या काली बरेच चित्रपट इथे शूट व्हायचे .. ( आता होईल सुरुवात ) .. लाल चौक बद्दल भरपूर ऐकलं होत , आणि तिथे जाऊन तिरंगा  🇮🇳 फडकत असतानाचा फोटो काढणं एक रोमांचकारी अनुभव होता .. गुलमर्ग ला बर्फात खेळताना जाकीट आणि स्वेटर ची गरज नाही लागली , फक्त सध्या शर्टवर होतो -- त्यामुळे कळालं कि शाहरुख आणि काजोल सध्या कपड्यांवर बर्फात कशे फिरतात 😂😂😂😂.. एक मात्र छान होत , जेवण मराठी + काश्मिरी होतं ..खास मी , मामा ( आमचे ग्रुप मधील सहकारी ) आणि अखिलेश .. आम्ही खास मुघल दरबार येथे काश्मिरी वाझवान ची चव चाखायला गेलो .. हि एक कश्मिरी पद्धतीने बनवलेला प्रकार जो बहुतांशी लग्नात २७ प्रकारचे विविध खाद्यपदार्थ असतात. आम्ही हॉटेल मध्ये हाल्फ वझवान सांगितलं आणि तो तिघांना पुरून उरला .. काश्मिरी काहवा तर क्या काहना .. एक गुलाबी चहा पिऊन तर पाहा .. 

बाकी आम्ही २० लोक आणि आमचे सारथी प्रणव घरात आणि कारण जोशी .. यांनी जाम  मजा केली ..

 पुढील ५दिवस , पहलगाम , बेताब व्हॅली , चंदनवाडी , बॅट फॅक्टरी , गुलमर्ग , गंडोला राइड , कार्पेट फॅक्टरी , दाखल लेक , शंकराचार्य मंदिर आणि येथून दिसणार श्रीनगर वा वा शबदात वर्णन अवघड आहे .. , मुघल गार्डन इत्यादी पाहण्यात गेले आणि हे सगळे पाहून वाटलं स्वीजरलँड या पेक्षा काय वेगळा असेल 🥰🥰🥰  किती आणि कशे फोटो काढायचे हा प्प्रश्न पडला .. प्रत्येक दिशेतून वेगळा काश्मीर .. काश्मीर हा भूभाग नसून एक वेगळच रसायन आहे .. मग हा स्वर्ग आहे , नांदावं आहे कि अजून काही .. या भूमीला लाखोंचे आशीर्वाद आणि सुबत्ता मिळो .. 

काही मुद्दे जे काश्मीर मध्ये अनुभवले 

१. सर्व लोक प्रचंड मृदुभाषी 
२. पर्यटन संदर्भातील  सर्वांना मराठी उत्कृष्ट समजते आणि येते , भारत माता कि जय , वंदे मातरम वगैरे पण म्हणतात ,.. 
३. भारत आणि त्यान्हस व्यापारिक संबंध या पलीकडे त्यांचे पाहायची इचछा  कमी 
४. अतिशय कमी महत्वाकांक्षी 
५. प्रचंड एकी ( म्हंजे टॅक्सी युनिअन , घोडेवाले युनिअन ) हे शिकण्यासारखं आहे 
६. खुश करो ( TIPS ) हे ब्रीद वाक्य घेऊन बऱ्यापैकी लूट असू शकते - आम्ही ग्रुप बरोबर होतो म्हणून अनुभव नाही आला .. 
७. हिवाळ्यात आणि बर्फवृष्टी चालू असताना घरगुती कामावर फोकस 
८. राजकीय नेत्यांचे मागे आंधळेपणाने जाणे ( जे सर्वत्र आहे ) 
९. गाड्यांची बिलकुल काळजी ना घेणं .. बहुतांषी कार धुळीने माखलेल्या 
१०. सी आर पी एफ बद्दल थोडा राग 

आयुष्यात कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त अनेकदा काश्मीर ला गेलाच पाहिजे .. शेवटी आहे तर भाताचा मुकुट .. आणि आहेच मुकुटासारखा .. 

जयहिंद .. 

राहुल  विनय बोधनकर
छत्रपती














Comments

Popular posts from this blog

Helpline for event managers

Virtual Events #NewNornal

मराठी युवकांसाठी वेबीनार - श्री सुहास दाशरथे