मित्र हरवला आहे 😢

मित्र हारावला आहे 

परवा विजु ला फोन लावला , फ़ोन नाही  उचलला , आणि फोन पण नाही केला 
मग कवी ला फोन लावला .. मी बीझी आहे करतो , पण नंतर पण नाही केला फोन
मग म्हणालो चला जाऊन भेटुन पिंटु ला .. गेलो तर छोटा पिंटु म्हणाला बाबा गावाला गेलाय 
नाऱ्या , मन्या , भज्या  सगळ्यांशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न केला ..  बिझी ..  बिझी ..  बिझी .. मी पण आणि तू पण ...म्हणून मित्र हरवलाय 
 
काय झालंय काय ? कसली स्पर्धा आहे ? कुणाला दाखवायचं  आहे ? कुणासाठी करायचं आहे ? याचे काही उत्तर ? फेसबुक आणि इन्स्टा , व्हाट्स अँप वर अंगठा दाखवला कि झाला झालं .. म्हणून मित्र हरवलं आहे .. 

 .. इतके बिझी ? कि एकेकाकळी मित्राच्या घरी हक्काने वावरणारे आपण इतके बिझी ? म्हणून मित्र हरवला आहे .. 
व्यवसाया निमित्त आपलं नवीन सर्कल तयार होतं म्हणून जुन्यांना विसरायचं ? म्हणून मित्र हरवला आहे 
एकमेकांना ज्या नावाने हाक मारायचो त्यात आता सर , बडी असे अनेक नवीन असांस्कृतिक शब्दांनी भर घातलीय - म्हुणुन मित्र हरवला आहे 
 मैत्रीचा एक नवीन काळ सध्या सर्वच अनुभवत आहेत .. आधी लहान सहान गोष्टी एकमेकांना सांगणारे मित्र एकमेकांपासून सर्व काही लपवू पाहत आहेत .. म्हणून मित्र हरवला आहे 
बरं  हे असं खरंच लपवता येत ? जवळच्या मित्रांना नाही का दिसत ? - म्हुणुन मित्र हरवला आहे 
आणि त्यावर जर कुणी काही विचारलं तर नंन ऑफ युअर बिजनेस म्हणून झटकण्यात त्यांना महान वाटतं .. - म्हुणुन मित्र हरवला आहे 
एखादा मित्र संकट जर असेल त्याची ख्यालीखुशाली फोन वर विचारून मोकळे होणे .. म्हुणुन मित्र हरवला आहे .. 
१ रूम किचन मध्ये आरामात लोळत पडणारे आता ४ बी एच के मध्ये सुद्धा मोकळेपणाने वावरत नाहीत - म्हणून मित्र हरवला आहे . 
भेटणं फक्त पार्टी आणि सेलेब्रेशन पुरतं मर्यादित झालंय - म्हणून मित्र हरवला आहे .. 
एकमेकांकडे जाणं  आणि येणं बंद झालंय का तर वेब सिरीज मध्ये डिस्टर्ब होतो .. म्हणून मित्र हरवला आहे 

तुझा मित्र हरवला नसेल तर जप त्याला .. कारण डॉक्टरच्या गोळ्या नाही मित्रांच्या टोळ्या हेच खरा औषध आहे .. मित्र जर हरवला तर नाही सापडत .. त्याला हरवू ना देणं हे फक्त मित्रच करू शकतो. ... कारण त्याला माहित असतं ... मित्र हरवला म्हणजे तो स्वतः हरवला .. 


राहुल विनय बोधनकर 
छत्रपती संभाजीनगर 

Comments

Popular posts from this blog

Helpline for event managers

Virtual Events #NewNornal

मराठी युवकांसाठी वेबीनार - श्री सुहास दाशरथे