औरंगाबाद शहर पुन्हा अनाथ
औरंगाबाद शहर पुन्हा अनाथ .. ना सरकारचा लक्ष , ना प्रशासनाच , आजचा आकडा २३० रुगणांची वाढ .. १०० चा एकदा पार करून आता २०० चा आकडा पार झालाय .. आता ३०० पण होईल आणि घरो घरी कोरोना .. इकडे फेसबुक वर भक्तांची आणि चमच्याची मस्त जुगलबंदी चालू आहे .. आणि शहर धोक्याची पातळी ओलांडून झाली कि सगळे दोषारोप करण्यात मग्न .. तिकडे नाशिक च्या व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद पळालेला आहे . आपल्याकडे रोजचे आकडे लक्षात घेतले तर प्रतिबंधित क्षेत्रात कोणाचाही वाचक नाही ..हे प्रभावी जाणवते आहे , जर प्रभावी वाचक असेल तर आकडे वाढायला नकोत आणि आणि प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर तर मुळीच नको .. लोक , प्रशासन , सरकार आणि मीडिया सगळे ढिम्म .. जे चाललय ते चालू द्या .. हमको क्या है ? आहेत आणि त्यामध्ये आमच्या सारख्या नियम पाळणाऱ्या लोकांची मात्र कुचंबणा होता आहे .. ३ महिने झले २२ तारखेला .. ऑफिस बंद आहे , कोणाकडे जायचा नाही आणि कोणाला बोलवायचा नाही , व्यवसायाची तर पार वाट लागली आहे .. आम्ही कधीही फुकटच्या मदतीची अपेक्षा केली नाही आणि करण्याची वेळही येऊ नए , पण सरकार आणि प्रशासनाने पुन्हा एकदा शहरावर लक्ष केंद्रित करावा