Eventwala

*इव्हेंटवाला...!*

*इव्हेंट मॅनेजर म्हणजे नक्की कोण.. ?* 

*तो डेकोरेटर आहे का ... ? नाही* 
*तो मंडपवाला आहे का.. ? नाही* 
*तो साऊंडवाला आहे का... ? नाही* 
*तो लाईटवाला आहे का.. ? नाही* 
*तो LED स्क्रीनवाला आहे का..? नाही*  
*तो फोटोवाला आहे का ... ? नाही* 
*तो इलेक्ट्रिअन आहे का... ? नाही* 
*तो मेकअप आर्टिस्ट आहे का.. ? नाही* 
*तो परमिशन एजन्ट आहे का.. ? नाही*
*तो कॉस्ट्यूमवाला आहे का... ? नाही* 
*तो ड्रेसवाला आहे  का.. ? नाही*
*तो कलाकार आहे का.. ? नाही* 
*तो डान्सर आहे का .. ? नाही* 
*तो गायकआहे का.. ? नाही* 
*तो हॉटेल वाला आहे का.. ? नाही* 
*तो ट्रॅव्हलवाला आहे का .. ? नाही*
*तो केटरिंगवाला आहे का.. ? नाही*

*मग तो कोण आहे नक्की... ???* 

*अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधील दिग्गज लोकांना अचूक पारखून एखाद्या इव्हेंटवर त्यांची निवड करतो, तो खरा इव्हेंट मॅनेजर. ह्या सर्व दिग्गजांच्या दोऱ्या ज्याच्या हातात असतात आणि तो ते समर्थपणे पेलू शकतो, तो खरा इव्हेंट मॅनेजर.. ह्या सगळ्यांचं ज्याच्यापासून एक पान देखील हलत नाही,  तो खरा इव्हेंट मॅनेजर.  शरीरातले सगळे अवयव सतर्क पणे जागे ठेऊन एकाच वेळी प्रेक्षकांशी बोलत असतो....  एकाच वेळी टेक्निशिअन्सना उपयुक्त सल्ले देत असतो.. एकाच वेळी वर्कर्सच्या खांद्यावर हात ठेऊन सांभाळून घेत असतो... एकाच वेळी स्पॉन्सर्सना खूष ठेवत असतो..  एकाच वेळी कलाकारांन् बरोबर कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत असतो... एकाच वेळी आधी झालेल्या आणि पुढे येणाऱ्या इव्हेंटचा विचार करत असतो, तो खरा इव्हेंट मॅनेजर..  दुसऱ्याचा इव्हेंट आपला स्वतःचा असल्या सारखं काम करतो, तो खरा इव्हेंट मॅनेजर... दुसरा कोणता इव्हेंट नाही ह्याची खात्री करून मगच स्वतःच्या घरचा इव्हेंट प्लॅन करतो, तो खरा इव्हेंट मॅनेजर...*  

*तसा इव्हेंटवाल्यांचा स्वभावच समजूतदार असतो... सगळ्यांना सांभाळून.. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचा..*
*"Client कडे पॆसे नाहीत.. "ओके  नंतर द्या..*
*वेंडर पैसे दिल्या शिवाय काम करत नाही.." *ओके  लगेच घ्या..*
*"इव्हेंटचा सेट छान दिसला पाहिजे हां !* *ओके नवीन गोष्टी विकत आणा.*
*"माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे, स्पेशअल करा काहीतरी.." ओके नविन थिम करूया..*
"GST मध्येच किती पैसे जातात, बजेट खूप नाही आहे हो.." ओके माझे पैसे कमी करा... 
"राऊंड फिगर करून टाक यार.. " ओके वरचे पैसे देऊ नका 
"कलाकार पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय स्टेजवर नाही येणार.." ओके  घरी पोचते करा.. 
टॅक्स भरायचा..  GST भरायचा... ढीगभर परमिशन काढायच्या... गव्हर्नमेंट / पोलिसांना अर्ज द्यायचे.. 
चुकलं असेल, नसेल तरी, Sorry, Thank you आणि Please म्हणून पुढे जायचं.. कारण ह्या सगळ्या मागे विचार पक्के असतात कि इव्हेंट मस्त झालाच पाहिजे..* 

*आज भारतामध्ये लाखोंनी इव्हेंट मॅनेजर्स आहेत.. वर्षाला करोडोंचा फायदा देशाला होतो.. आणि दिवसेंदिवस ती संख्या वाढतीय.. त्याचं प्रस्थ वाढत जातंय.. मोठ्या शहरा पासून ते लहान गावापर्यंत सगळे ह्या इंडस्ट्रीचे भागीदार होत आहेत.  तरी कुरकुर न करता आनंदाने काम करणारी हि एकमेव इंडस्ट्री असावी.. "सगळं नीट होईल" ,"बघू"  अश्या विचारांनी  हि इंडस्ट्री चालत नाही.. कारण स्वप्नात काम करण्यापेक्षा, स्वप्न सत्यात उतारवण्याकडे इव्हेंटवाल्यांचा जास्त  कल असतो.*

*इव्हेंट हा एकात एक अडकलेल्या चक्राच्या घड्याळाप्रमाणे असतो.. प्रत्येक चक्र ज्याचं त्याचं काम करत असतं.. एक जरी चक्र थांबल कि घड्याळ थांबतं.. हे सगळं पेलण्यासाठी अतिशय  हुषार आणि मेहनती टीम लागते. त्या टीमला जपावं लागत.. २४ तासामध्ये १७-१८ तास एकत्र राहून काम करत असतो त्यामुळे एक छान नवीन कुटुंब तयार होतं.. वेळ न मिळाल्यामुळे घरी फक्त झोपायला जातो.. (बरेचदा जात पण नाही) त्यामुळे सहवास इतका असतो कि एकमेकांची सुख दुःख आपली वाटू लागतात.. एक घट्ट नातं तयार होतं. पण ह्या कुटुंबाला भेटून बरेच दिवस झाले.. विडिओ कॉल वर भेटून आता अस्वस्थ वाटू लागलंय... सुचेनासं होतंय..*

*गेले काही दिवस.. काही  महिने असेच गेले...  पुढे किती दिवस .. किती महिने असे  राहणार माहित नाही.. आत्ताच्या परिस्थितीबद्दल जेंव्हा गप्पा होतात, तेंव्हा एकदम सहज लोकं म्हणून जातात, " तुमची तर वाटचं आहे.. हे वर्ष अख्खं  गेलं.. २०२१ तरी कसं जाईल..? इव्हेंट्स सगळ्यात शेवटी चालू होणार.. " पटकन मनाला हूर हूर लागते..   गेली १५-२० वर्ष नॉनस्टॉप काम केल्यावर असं शांत विचार करत घरी किती दिवस बसायचं.. ?  ज्यांना राहावलं नाही त्यांनी मास्क विकले, काहींनी हॉस्पिटल्स ना cleaning material पोचवले... काहींनी virtual  इव्हेंट्स चालू केले.. तर काहींनी शेतीचा मार्ग धरला..  पण हे किती दिवस पुरणार.. ? पैसे कसे कमवणार..? पगार कसे देणार..? वर्षभराचं इव्हेंट्स गणिताचं बदलून गेलंय.. रोज काम करून  पोट भरणाऱ्यांनी कुठे जायचं..? आणि कसं  जगायचं..? व्हॉलेंटिअर, लेबर अश्या लोकांनी काय करायचं..? आता पुढे काही दिसत नाही म्हणून " कुच और सोचना पडेगा ... !" असा विचार करणं  किती योग्य आहे...? इतके वर्ष जीव लावून, कोणाची पर्वा न करता, तन मन धन सगळं वाहून काम केलं.. आणि आता हे क्षेत्र बदलायचं.. किंवा फक्त "होईल...", "बघू..."  म्हणून वाट बघायची.. ?* 

*पटत नाही...*  

*मान्य आहे, संकट खूप भयंकर आहे... पटकन सुधारणा होणं  हे आपल्या हातामध्ये नाही.. पण ह्यामध्ये हळू हळू सुधारणा होऊन काम कसं सुरु करता येईल ह्याचा विचार खूप फास्ट ट्रॅक वर केला पाहिजे.. आणि लवकरात लवकर आमलात आणला पाहिजे.. परिस्थितीचा अंदाज घेऊन social distancing चे  नियम पाळून किंवा अजून नवे नियम  घालून "पुन:श्च हरी ओम" केला पाहिजे.. एखाद्या कार्यक्रमाला गर्दी  वाढविण्यापेक्षा दर्दी असावेत.. quantity पेक्षा quality वर भर दिला जावा.. उदा. एखाद्या exhibition मध्ये टाईम स्लॉट नुसार आणि कमी संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती राहील ह्याची काळजी घेता येईल.. नियम न मोडता  दिवाळी पहाट सारखा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करता येऊ शकतो. खेळ, लग्न, वाढदिवस, मैफिल अश्या अनेक इव्हेंटचं आयोजन नियमांचं  पालन करून करता येऊ शकतं. मार्ग नक्की निघू शकतो.* 

*अशी परिस्थिती सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे.  पण त्यांना पाठबळ मिळतंय.. सगळी क्षेत्र हळू हळू चालू होत आहेत.. काही ना काही मार्ग निघत आहेत.. त्यांच्यासाठी काही संस्था, सरकार मदतीचा हात पुढे करत आहे.. इव्हेंट मॅनेजरने कधी कोणाकडे काहीचं मागितलं नाही.. कोणासमोर मदतीचा हात पसरला नाही..  पण हि इंडस्ट्री वाचवण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया...  खचून नाही गेलोय.. आमच्या पंखांना आम्हीच बळ देऊ.. आम्ही परत उभे राहू.. फक्त तुमची साथ हवीय..*

*कुसुमाग्रज्यांच्या कवितेमधल्या शेवटच्या ओळी आठवतात..* 
 
*मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा,*
*पाठीवरती हात ठेउनी, फक्त लढ म्हणा...* 

*Hoping for a better future..!!!*

युगांतर🙏🏻🙏🏻🙏🏻

- अनामिक

Edited by #EventwritesbyRVB©️

Comments

Popular posts from this blog

Helpline for event managers

Virtual Events #NewNornal

मराठी युवकांसाठी वेबीनार - श्री सुहास दाशरथे