वेडींग प्लॅनिंग - अनावश्यक की आवश्यक
सध्या सोशल मीडिया वर रिसॉर्ट मधील लग्न आणि त्यावर होणार वारेमाप खर्च यावर खूप टीका टिप्पणी होत आहे .. एक इव्हेंट व्यावसायिक म्हणून आणि वेडिंग प्लॅनर म्हणून काही गोष्टी निदर्शनास आणून द्यायचा हा मानस.
सर्वप्रथम असल्या पोष्टी फक्त मराठी भाषेतील काही विशिष्ट लोकांनी पसरविले आहे.. सर्वप्रथम वेळेच्या गरजेनुसार पहिल्यापासून विवाह समारंभ छान व्हावा असे सर्वाना वाटते .. मराठी लोकं पहिले नौकरी मध्ये असल्यामुळे त्यांचं एक सर्कल मर्यादित होतं .. मला आठवतं मी लहान ६ वि किंवा ७ वित असताना आमच्या कॉलनी मधील एक अ मराठी समाजातील लग्न औरंगबाद अशोक हॉटेल मध्ये होतं .. आई बाबांनी दटावले होता फार हपापल्या सारखं खायचं आणि वागायचं नाही .. पहिले मराठी समाजातील विवाह सुद्धा मर्यादित असायचे .. पहिले मल्होत्रा , सिंघानिया , जैन असे नावं आपल्यायाला चित्रपटात सुद्धा ऐकायला मिळायचे .. हम आपके है कौन या चित्रपटात १९९४-१९९५ साली आपण लग्न कसा असावा हे पाहिलं आणि सगळ्यांनी एन्जॉय पण केलं .. मग बूट चोरणे , संगीत हे प्रकार हळूहळू विवाह समारंभात शिरले ..
आता मराठी समाज उद्योग व्यव्यसायात आला आहे.. कॉस्मो पॉली च्या कल्चर मध्ये इतर समाजातील मित्र परिवार वाढला , अर्निंग कॅपॅसिटी पण वाढली आणि त्यांच्या लग्न समारंभात उठबैस वाढली .. पहिले ८-१० मुलं असायची , आता १-२ मुलं असतात .. वेडीॅग प्लॅनिंग या मधे त्यातलया त्याच पिंटरेस्ट , इंस्टग्राम , गुगल याची भर पडली ..
आता मुद्दा येतो तो विवाहामध्ये होणार खर्च आणि त्याचे व्यवस्थापन .. पहिले म्हणजे वेडिंग प्लांनिंग एक मोठा व्यवसाय आहे.. हळू हळू आता ती एक इंडस्ट्री होत आहे .. भारतात दार वर्षी सव्वा करोड विवाह होतात .. ४० लाख करोड एवढा मोठी उलाढाल या क्षेत्रात होते.. काही गोष्टी ज्या सध्या विवाह समारंभात सध्या ट्रेंडिंग आहेत ते म्हणजे .. नवरा - नवरी चे आगमन , टॅटू , गेम्स , कार्निवल, थिम्स , संगीत , कॅटरिंग यामध्ये .. पिझ्झा , पास्ता , कुल्फी , चाट, लेबनीज , इटालियन इत्यादी .. पण एक गोष्ट टीका करणारे विसरतात ते म्हणजे .. या सगळ्यांना एक रोजगार मिळतो आहे.. आज पाणी पुरी , टॅटू , अँकर , डान्सर आणि या सारख्या कलावंतांना मानधन मिळते ,, त्यांची चूल पेटते .. त्यांची घरे चालतात .. एका विवाह समारंभ मध्ये ६०-७० सर्विसेस लागतात .. एका सर्व्हिस साठी ४ लोकांचे कुटुंब असा विचार केला तर २४० लोकांचे अर्थकारण + कॅटरिंग यामधील ५० आणि डेकॉर मधील ५० अश्या साधारण ४०० लोकांचा उदरनिर्वाह यावर चालतो .. आता बघा आणि ठरवा डेस्टिनेशन वेडिंग , रिसॉर्ट वेडिंग , फायदेशीर आहे का तोटा .. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा वेड इन इंडिया अशी संकल्पना प्रमोट करतात.. आमचं इमा चे अध्यक्ष समित गर्ग .. त्याही पुढे जाऊन .. वेड इन इंडिया आणि स्पेंड इन इंडिया अशी संकल्पना राबवतात ...
आता कर्ज घेऊन लग्न करणं आणि कर्ज घेऊन घर बांधणं , कार घेणं , परदेश प्रवास करणं सगळच वाईट .. पण ज्याची ऐपत असेल तो करेल ... समाजातील एका उत्तम व्यवसायाला टीका कर या सभ्य व्यक्तींना शोभत नाही,, एक मात्र खरंय वेडिंग प्लॅनर ची मदत घेतली तर अनावश्यक खरचला आळा बसणार हे नक्की.
राहुल विनय बोधनकर
बोधनकर इव्हेंट्स एल एल पी
Comments
Post a Comment